Monday, December 20, 2010

लोकसत्तातील स्वेच्छानिवृत्ती योजना बारगळली

गेल्या दोन महिन्यांपूर्वी लोकसत्ताच्या संपादकीय विभागात स्वेच्छानिवृत्तीची नोटीस लागली आणि काही जणांत उत्साह संचारला
काही उत्साही मंडळींनी तातडीने जाऊन संपादकांची भेट घेऊन आपल्याला स्वेच्छानिवृत्ती हवी असल्याचे सांगत अर्जही दिला. लोकसत्तातील ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांनी तर तुला सांगतो म्हणून जवळपास प्रत्येकाला या योजनेमुळे आपल्याला कसा फायदा होणार आहे, याचे अंकगणित सांगत ऐकणा-या प्रत्येकाची शाळा घेतली. महापे येथे जाण्यापेक्षा इथे स्वेच्छानिवृत्ती घेऊन दुसरीकडे कमी पगाराची का होईना पण नोकरी स्वीकारू असा व्यवहार्य विचार करत नंदू जावळे, अभय जोशी वैगेरे प्रभुतींनी स्वेच्छानिवृत्तीचे गणित मांडायला सुरुवात केली. सुहास गांगल यांनीही चाचपणी केली. प्रसाद केरकर यांनीही अर्ज केला. त्याच दरम्यान रवींद्र पांचाळ यांची नागपूरला बदली झाली, त्यांनी मग तातडीने स्वेच्छानिवृत्तीची इच्छा प्रदर्शित केली. मात्र तुम्ही नागपूरला रुजू होऊन तेथून अर्ज करा, अशी सूचना त्यांच्या हितचिंतकांनी केली.पण सर्वांच्याच इच्छा-आकांक्षांवर पाणी फिरले. कारण स्वेच्छानिवृत्तीपोटी मिळणारे १५ लाख रुपये आणि ज्यांनी याकरिता अर्ज केलेला होता, त्यांची आजवर कंपनीत झालेली सेवा यामुळे सरासरी २५ ते ३० लाख रुपये व्यवस्थापनाला मोजावे लागणार होते. माशी कुठे शिंकली ते समजले नाही पण व्यवस्थापनाने संपादकीय विभागातील स्वेच्छानिवृत्ती योजनाच रद्द केली. त्यामुळे लोकसत्तेतील काही रामशास्त्री बाण्याच्या पत्रकारांनी मग संपादकीय विभागात स्वेच्छानिवृत्ती द्यायचीच नव्हती, तर तिथे नोटीसच का लावली, अशी विचारणा करायला सुरुवात केली.मात्र तूर्तास तरी ही योजना बारगळली आहे !
...
...
तर काहींच्या पोटात भीतीचा गोळा उठला.