Wednesday, December 15, 2010

प्रकाश अकोलकर निवृत्तीच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्र टाइम्सचे डेप्युटी एडिटर प्रकाश अकोलकर या महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. मुंबईतील पत्रकारितेच्या सुमारे तीन दशकांचा एक जागता साक्षीदार आता मुख्य प्रवाहातून बाहेर पडणार आहे.
नेमकेपणा, सोप्पं आणि चुरचुरीत लिखाण ही अकोलकरांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये. वार्ताहर म्हणून मुंबई महापालिका आणि नंतर राजकीय वार्तांकन या दोन्ही ठिकाणी अकोलकरांनी आपला ठसा उमटवला.
अकोलकरांचे शिवसेनेवरील प्रेम तर सर्वांच्याच परिचयाचे ! जय महाराष्ट्र हे त्यांचे पुस्तक म्हणजे पत्रकारांना शिवसेना समजावी म्हणून केलेला एक दस्तावेजच ठरला आहे. हे पुस्तक पाहून राज ठाकरे यांनी तर अकोलकरांना तुमचे पुस्तक हे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या विषयावरील चित्रपटाचा स्क्रीन प्ले असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
...शिवसेनाप्रमुख़ांच्या रुपाने युतीला अमिताभ बच्चन मिळाला ! बाळासाहेबांच्या पहिल्या मराठवाड्याच्या दौèयात अशा आशयाचे वृत्तांकन करून अकोलकरांनी थेट बाळासाहेबांचे वागबाण् झेलले होते.
मुख्य प्रवाहातून जरी अकोलकर आता काही काळानी निवृत्त होणार असले तरी, ते चेअरमन असलेल्या प्रेस क्लबमध्ये संध्याकाळी त्यांना हक्काने भेटता येईल, आणि
नव पत्रकारांना त्यांचे मार्गदर्शनही मिळवता येईल !