Thursday, December 30, 2010

टीव्ही ९ वृत्तवाहिनीच्या वार्ताहराला मारहाण

टीव्ही या वृत्तवाहिनीत वार्ताहर म्हणून काम करणा-या अजित उजैनकर यांना अलीकडेच मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मारहाण झाल्याचे समजते. विमानतळ परिसरात असलेल्या अनधिकृत झोपड्यांचे चित्रीकरण करत असताना त्यांना स्थानिकांनी मारहाण केली. वृत्तवाहिनीने या संदर्भात गुन्हाही दाखल केला आहे.

Friday, December 24, 2010

रोहितभाऊ तुम्ही सुद्धा ?

 
मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाकोट्यामुळे आजवर अनेकांचा गृहप्रवेश सुलभतेने झाला. किंबहुना ही एक परंपराच आहे. पण याच्या कधी बातम्या झाल्या नाहीत. कारण त्याचे बहुतांश लाभार्थी हे बातमीदारच होते. गृहलाभ झालेल्या अनेक बातमीदारांनी आपल्याला मिळालेली घरे यथावकाश विकली. पण या परंपरेला छेद देत प्रहार या नारायण राणे यांच्या मालकीच्या वर्तमापत्राने काही महिन्यांपूर्वी एक वृत्तमालिका प्रसिद्ध केली आणि आजवर किती पत्रकारांनी मुख्यमंत्री कोट्यातून घरे घेतली आणि त्यातील किती पत्रकारांनी ती घरे विकली, हे जनताजनार्दनासमोर मांडले. त्यानंतर मग या विषयावर अपेक्षेप्रमाणे बराच उहापोह झाला. अनेक वर्तमानपत्रांत आणि वृत्तवाहिन्यांतून यावर दळण दळले गेले. आता हे नमनाला घडाभर तेल यासाठी की, अलीकडेच इकोनॉमिक टाइम्स या वर्तमानपत्रात रुजू झालेल्या रोहित चंदावरकर यांनी CM's quota allottees make a killing on flat resale या मथळ्याखाली २3 डिसेंबरच्या अंकात हेच वृत्त पुन्हा दिले. मद्य जुनेच बाटली नवीन !वास्तविक एखादा वरिष्ठ बातमीदार एखाद्या नव्या वर्तमापत्रात रुजू झाला की, सुरुवातीला एखादे दणकेदार वृत्त देणे हा एक संकेत आहे. या संकेताचे पालन करताना एकदा छापून आलेले वृत्त परत देऊ नये, या संकेताला फाटा बसला. मात्र चंदावरकरांच्या यांनी दिलेले वृत्त कसे जुने आहे, याचा प्रसार ते ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियातून पुन्हा प्रिंटमध्ये आले त्यातील वार्ताहरांनी २3 डिसेंबरच्या सकाळपासूनच एसएमएसद्वारे केला.
 
आपल्या अधिक माहितीसाठी रोहित चंदावरकर यांच्या मूळ बातमीची लिंक -
http://economictimes.indiatimes.com/markets/real-estate/news-/cms-quota-allottees-make-a-killing-on-flat-resale/articleshow/7148404.cms

Wednesday, December 22, 2010

साक्षी बर्वे यांचा झी-२४ तासमधून राजीनामा

झी २४ तास या वृत्तवाहिनीच्या मनोरंजन विभागात कार्यरत असलेल्या साक्षी बर्वे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, लवकरच त्या स्टार प्रवाह वाहिनीमध्ये रुजू होणार असल्याचे समजते.

Tuesday, December 21, 2010

सुधीर सूर्यवंशी लवकरच डीएनएमध्ये

मुंबई मिररमध्ये वरिष्ठ वार्ताहर म्हणून कार्यरत असलेले सुधीर सूर्यवंशी हे लवकरच डीएनए वर्तमानपत्रात प्रिन्सिपल करस्पॉन्डट पदावर रुजू होणार आहेत. मुंबई मिररमध्ये मुंबई महापालिकेचे बीट यशस्वीरित्या सांभाळणा-या सूर्यवंशी यांच्यावर रिअल इस्टेट बीटची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.

Monday, December 20, 2010

लोकसत्तातील स्वेच्छानिवृत्ती योजना बारगळली

गेल्या दोन महिन्यांपूर्वी लोकसत्ताच्या संपादकीय विभागात स्वेच्छानिवृत्तीची नोटीस लागली आणि काही जणांत उत्साह संचारला
काही उत्साही मंडळींनी तातडीने जाऊन संपादकांची भेट घेऊन आपल्याला स्वेच्छानिवृत्ती हवी असल्याचे सांगत अर्जही दिला. लोकसत्तातील ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांनी तर तुला सांगतो म्हणून जवळपास प्रत्येकाला या योजनेमुळे आपल्याला कसा फायदा होणार आहे, याचे अंकगणित सांगत ऐकणा-या प्रत्येकाची शाळा घेतली. महापे येथे जाण्यापेक्षा इथे स्वेच्छानिवृत्ती घेऊन दुसरीकडे कमी पगाराची का होईना पण नोकरी स्वीकारू असा व्यवहार्य विचार करत नंदू जावळे, अभय जोशी वैगेरे प्रभुतींनी स्वेच्छानिवृत्तीचे गणित मांडायला सुरुवात केली. सुहास गांगल यांनीही चाचपणी केली. प्रसाद केरकर यांनीही अर्ज केला. त्याच दरम्यान रवींद्र पांचाळ यांची नागपूरला बदली झाली, त्यांनी मग तातडीने स्वेच्छानिवृत्तीची इच्छा प्रदर्शित केली. मात्र तुम्ही नागपूरला रुजू होऊन तेथून अर्ज करा, अशी सूचना त्यांच्या हितचिंतकांनी केली.पण सर्वांच्याच इच्छा-आकांक्षांवर पाणी फिरले. कारण स्वेच्छानिवृत्तीपोटी मिळणारे १५ लाख रुपये आणि ज्यांनी याकरिता अर्ज केलेला होता, त्यांची आजवर कंपनीत झालेली सेवा यामुळे सरासरी २५ ते ३० लाख रुपये व्यवस्थापनाला मोजावे लागणार होते. माशी कुठे शिंकली ते समजले नाही पण व्यवस्थापनाने संपादकीय विभागातील स्वेच्छानिवृत्ती योजनाच रद्द केली. त्यामुळे लोकसत्तेतील काही रामशास्त्री बाण्याच्या पत्रकारांनी मग संपादकीय विभागात स्वेच्छानिवृत्ती द्यायचीच नव्हती, तर तिथे नोटीसच का लावली, अशी विचारणा करायला सुरुवात केली.मात्र तूर्तास तरी ही योजना बारगळली आहे !
...
...
तर काहींच्या पोटात भीतीचा गोळा उठला.

Saturday, December 18, 2010

आपल्या माहितीसाठी...

मित्रांनो, या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याकडे असलेली माहिती, किस्से आणि अर्थातच गॉसिप आपण आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. पण माहिती देताना एक दक्षता आवर्जून घ्या, ती अशी की, आपल्या माहितीत कोणावरही व्यक्तीगत चिखलफेक नसेल किंवा हेतूपुरस्सर कोणाची बदनामी करण्यासाठी माहिती पाठवू नका. निखळ मनोरंजन आणि माहितीचे आदानप्रदान हाच हा ब्लॉग सुरू करण्यामागचा हेतू आहे.आपली माहिती आपण

-
fakingnews2010@gmail.com या ई-मेल आयडीवर मेल करू शकता.रिपोर्टर

Wednesday, December 15, 2010

प्रकाश अकोलकर निवृत्तीच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्र टाइम्सचे डेप्युटी एडिटर प्रकाश अकोलकर या महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. मुंबईतील पत्रकारितेच्या सुमारे तीन दशकांचा एक जागता साक्षीदार आता मुख्य प्रवाहातून बाहेर पडणार आहे.
नेमकेपणा, सोप्पं आणि चुरचुरीत लिखाण ही अकोलकरांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये. वार्ताहर म्हणून मुंबई महापालिका आणि नंतर राजकीय वार्तांकन या दोन्ही ठिकाणी अकोलकरांनी आपला ठसा उमटवला.
अकोलकरांचे शिवसेनेवरील प्रेम तर सर्वांच्याच परिचयाचे ! जय महाराष्ट्र हे त्यांचे पुस्तक म्हणजे पत्रकारांना शिवसेना समजावी म्हणून केलेला एक दस्तावेजच ठरला आहे. हे पुस्तक पाहून राज ठाकरे यांनी तर अकोलकरांना तुमचे पुस्तक हे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या विषयावरील चित्रपटाचा स्क्रीन प्ले असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
...शिवसेनाप्रमुख़ांच्या रुपाने युतीला अमिताभ बच्चन मिळाला ! बाळासाहेबांच्या पहिल्या मराठवाड्याच्या दौèयात अशा आशयाचे वृत्तांकन करून अकोलकरांनी थेट बाळासाहेबांचे वागबाण् झेलले होते.
मुख्य प्रवाहातून जरी अकोलकर आता काही काळानी निवृत्त होणार असले तरी, ते चेअरमन असलेल्या प्रेस क्लबमध्ये संध्याकाळी त्यांना हक्काने भेटता येईल, आणि
नव पत्रकारांना त्यांचे मार्गदर्शनही मिळवता येईल !

Friday, December 10, 2010

बातमीदार ब्लॉग गायब ?

गेल्या वर्ष भरापासून प्रामख्याने मराठी मीडियातील बारीकसारीक घडामोडी पत्रकारांपर्यंत पोहोचवणाèया बातमीदार ब्लॉगचे झाले तरी काय, अशा प्रश्नाने सध्या तमाम मराठी पत्रकारांना ग्रासले आहे. दिवसभर कुठल्या ना कुठल्या बीटवरील आतल्या गोटातल्या बातम्या काढत qहडणाèया श्रमजीवी पत्रकारांना संध्याकाळी कार्यालयात आल्यावर गॉसिपपूर्ण विश्रांतीचा हा एक चांगला कट्टा तयार झाला होता. सर्व घडामोडी अगदी व्यवस्थित सर्वांना समजायच्या...पण अचानक एकेदिवशी हा ब्लॉग गायब झाला आणि तमाम पत्रविश्वात यावर चर्चा सुरू झाली...

हा ब्लॉग का बंद झाला असावा, या संदर्भात आम्हाला कळलेल्या दोन गावगप्पा अशा की,
१) गेल्या तीन आठवड्यांपासून बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे येथील पत्रकारांची खासियत या ब्लॉगने उघडी केल्याने कुणीतरी ठाणे पोलिसांच्या सायबर टीममध्ये आपले वजन वापरून हा ब्लॉग बंद केला.

२) दुखावलेल्या पत्रकारांच्या समुहाने संगणकतज्ज्ञांच्या मदतीने हा ब्लॉग हॅक केला.

...काहीही असो. एक चांगला ब्लॉग बंद झाला याची खंत मात्र आहे.

- रिपोर्टर