Sunday, February 13, 2011

प्रतीक्षा भास्कराची

सध्या मराठी पत्रकार्यालयात एकच धामधूम आहे, जो तो आपला रिझ्युम अपडेट करण्यात मग्न झालाय. त्यामुळे अरे चल...मी निघतोय...बसू या का आज..वगैरे सहका-यांच्या निरोपाला...तू हो पुढे...मला जरा वेळ लागेल. एका लेखासाठी नेटवर बसायचे आहे असे सांगून एक दुस-याला कल्टी देण्यात येत आहे. या सगळ्यामागचं निमित्त आहे ते दिव्य भास्कराच्या उदयाचे. दिव्य मराठी नावाने नोंदणी होऊन हे नवे वर्तमानपत्र लवकरच मराठी वाचकांच्या भेटीला येणार आहे. मराठी वाचकांच्या आयुष्यात फारसा फरक पडणार नसला तरी मराठी पत्रपंडितांच्या आयुष्यात मात्र सुगीचे दिवस येणार आहेत. सध्या रिझ्युम अपडेटचे काम आणि नेमके कुणाला कॉन्टेक्ट करायचे याची माहिती मिळाली की, मग सुगीच्या दिवसांबाबत चर्चा करण्यासाठी पत्रपंडितांच्या हुरडा पार्ट्या प्रेस क्लब किंवा कार्यालयाच्या नजीकच्या मयखान्यात भरतील. तर मुद्दा आहे दिव्य मराठीचा. हे दिव्य कसे अवतरते याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. नवे वर्तमानपत्र सुरू होताना संपादक कोण यावर मात्र खुलेआम चर्चा सुरू झाली आहे. ज्यांच्या आडनावात कर आहे आणि ज्यांच्या पुढे कर जोडल्याशिवाय तूर्तास तरी मराठी पत्रकारितेत पर्याय नाही, अशा काही करामती व्यक्तींची नावे नेहमीप्रमाणे चर्चेत आहेत. केतकर, टिकेकर, खांडेकर, लाटकर वैगेरे...त्यामुळे याही मंडळींना अलीकडे सदिच्छांचे फोन कॉल्स आणि एसएमएस वाढले असल्याचे समजते. परंतु, प्रहार मुंबईत येतेवेळी ज्या पद्धतीने मंथन झाले होते , तसेच काहीसे आताही होईल असे बोलले जात आहे. मराठी पत्रकारांसाठी दुग्धशर्करा योग म्हणजे, प्रत्येक कार्यालयातून अपरेझलचे वारे वाहायला लागले असतानाच, नव्या वर्तमानपत्राची घोषणा झाल्याने आता अपरेझलच्या मुलाखतीसाठी संपादकापुढे जाताना प्रत्येक जण ताठ मानेने जाणार आहे...आणि आपल्या मूल्याचे प्रेझेंटेशन करणार असल्याचे समजते. असो...तूर्तास तरी आम्हाला प्रतीक्षा आहे ती भास्कराच्या उदयाची. एकदा उदय झाला की, मग होणारी हलचल आणि कुणाचे काम होऊ नये म्हणून जाणूनबुजून आमच्याच बांधवांकडून सोडण्यात येणा-या पुड्या...गॉसिप याची आम्हाला प्रतीक्षा आहे.

Tuesday, February 8, 2011

बोजेवारांची अडिचकी...

श्रीकांत बोजेवार यांनी लोकसत्तेच्या निवासी संपादकपदाची धुरा सांभाळल्याचे वृत्त पसरले आणि लोकसत्तेच्या पत्रकारांना घटनेचा अर्थ-अन्वयार्थ लावण्यासाठी आणखी एक नवा विषय मिळाला. प्रत्येकजण आपापल्या सोयीने, अनुभवाने, बदललेल्या वातावरणाच्या अनुषंगाने याचा अर्थ लावत असल्याचे समजते. फारशी बातमीदारी केलेल्या, बातम्याचे संपादनही फारसे केलेल्या आणि कायम फिचर्स, सटायर लिखाण केलेल्या बोजेवारांच्या गळ्यात ही माळ पडली तरी कशी, यावरच प्रामुख्याने खल सुरू असल्याचे समजते. पण तरीही आता नव्या बदलांशी जुळवताना प्रत्येकाने काही ना काही योजना आखल्याचेही वृत्त आहे. काही बातमीदारांनी म्हणे आता दोन फूल आणि एक हाफ स्टाईलमध्ये बातम्या लिहिण्याचे निश्चित केल्याचे कळते. आता या धोरणाचा काहींनी अवलंब केला की, त्यांच्या बातम्या अधिक ठळकपणे छापून येणार असे माहिती असल्याने नाराजीने का होईना पण अन्य बातमीदारांनीही याचा स्टाईलचा अवलंब करायचे ठरवले आहे. बोजेवारांनी पदभार स्वीकारल्याच्या संध्याकाळीच आपापल्या बीटवरून कार्यालयात रिपोर्टर्स आले तेव्हा सर्वांची एक अनौपचारिक बैठक झाली म्हणे. रिपोर्टर्सच्या वर्तुळात मानाचे स्थान असलेल्या आणि केतकर साहेबांचे सारथी असलेल्या सादतभाईंनी विषयाला हात घालत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये...ये बहुत ही अच्छा है...वगैरे सुरूवात केली. मग काय संतोष प्रधानांनी तर ..वा.वा..म्हणजे काय...आता आमच्या बातम्यांची स्टाईल बघा फक्त तुम्ही...असे म्हणत मुद्याला हात घातला...अँग्री यंग मॅन समर खडस यांनी दोन फूल ठिक आहे पण च्यायला हे हाफ वगेरै आपल्याला जमणार नाही. हे साले हाफ म्हणजे हाफ चड्डीची लाईन...वगैर म्हणत...आपले कम्युनिस्ट धोरण अधोरेखित केले. केदार दामले म्हणाले, अरे पण मी तर दररोज तीन हाफच बातम्या देतो...म्हणजे आता मी जर दोन फूल आणि एक हाफ बातमी दिली..तर पाच हाफ इतकीच माझ्या कामाची नोंद होणार का...रामशास्त्री गोगटे साहेबांनी तर याच्याही पुढे जात, अरे पण माझा काय संबंध ? नीट काय ते धोरण स्पष्ट व्हायला पाहिजे...माझी एक बातमीच पाच कॉलमी असते...म्हणजे चार फूल आणि एक हाफ...मग मी कसे लिहायचे आहे...सुनील डिंगणकर तर बोजेवारांच्या या नियुक्तीनंतर फारच खूश झाल्याचे समजते...कारण बोजेवारांच्या मार्गावरून त्यांचा प्रवास सुरू असल्याने भविष्यात आपणही लोकसत्तेत निवासी संपादक होऊ शकतो, अशी स्वप्न त्यांना पडायला लागली आहे...असो...तिकडे डेस्कची मंडळी मनात म्हणताहेत की, आधीच महापे त्यात बोजेवार ! लोकसत्तेच्या कर्मचा-यांचे एकवेळ ठिक आहे, पण बोजेवारांच्या या नियुक्तीने लोकसत्ताच्या बाहेरची अन्य दोन मंडळीही प्रचंड व्यथित झाली आहेत...एक म्हणजे आपला नंबर लागेल या आशेवर असलेले शब्दच्छलसम्राट प्रवीण टोकेकर आणि दुसरे म्हणजे बोजेवारांचे शेजारी शैलेंन्द्र शिर्के...असो...जगात काहीही घडले तर सव्वा नऊची गाडी आजवर चुकवणा-या बोजेवारांना निवासी संपादक झाल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत कार्यालयात राहावे लागत असल्याने तेही जवाबदारीबरोबर आलेल्या या नव्या दुःखाला कशी वाचा फोडायची या विवंचनेत आहेत...कदाचित निवासी संपादकपदी आरूढ झाल्यानंतर येणा-या पहिल्या रविवारी याच विषयावर ते दोन फूल एक हाफ लिहितात का...याची प्रतीक्षा आम्हा सर्वांना आहे.

Monday, February 7, 2011

मटाला झालंय तरी काय...

दुस-या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या काही दिवसांनी मटामध्ये मटा विशेष म्हणून येऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेक वाचकांना देशी बाटलीतून विदेशी दारू प्यायल्यासारखे वाटू लागले आहे. मटाला झालंय तरी काय...असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आज तर एकजण ट्रेनमध्ये मटा वाचताना म्हणाला अरे मटाचं डोक ठिकाणावर आहे काय....मटा हे आंतराष्ट्रीय ख्यातीचे दैनिक... मुंबईत एक नंबरवर असणारे हे दैनिक पुण्यात सध्या प्रस्थापितांशी जोरदार टक्कर देते आहे. त्याचवेळी मुंबईत मात्र सगळा आनंदीआनंद सुरू आहे. परवा मटामध्ये वारली चित्रकार जिव्या मसे याची बातमी मटा विशेष म्हणून छापून आली. ती बातमी लोकमत, महानगर या दैनिकांनी पाठपूरावा केलेली होती. मटाने मात्र ज्यावेळी त्या कलाकारला जमीन मिळाली त्यावेळी विशेष करून छापली. नरेश कदम नावाच्या एका पत्रकाराने ती दिली होती. त्यानंतर पुन्हा गिरणी कामगारांच्या घरांची बातमी मटा विशेष म्हणून छापून आली आहे. काही दिवसांपूर्वी हीच बातमी सामनामध्ये छापून आली होती. ही बातमी सुद्धा नरेश कदम यांनी दिली आहे. त्यामुळे कदम यांनी दिलेल्या बातम्या या सर्व मटा विशेष असतात आणि बाकीच्यांच्या सर्व किरकोळ असतात अशी चर्चाही मटाच्या कार्यालयात रंगल्याचे समजते. कदम यांना आदीवासी चित्रकाराच्या बातमीवरून मटाने चांगली बातमी म्हणून बक्षीसही दिले. त्यामुळे मटाच्या कार्यालतील अनेकांचा सात्विक संताप झाला आहे. प्रवीण मुळे यांचा रेकॉर्ड ब्रेक करीत कदम यांनी बक्षीस मिळविले अशी चर्चा सध्या मटाच्या कार्यालयात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. जयंत होवाळ हे नवे चिफ रिपोर्टर तर, म्हणे हा पुरस्कार जाहीर झाला आणि चक्कर येऊनच पडले. अनेकांना वाटले की ते दिवसाही पिऊन येऊ लागले की काय... (दूध) पण त्यांना तो धक्काच सहन झाला नाही... म्हणून चक्कर आली. पण नेमकं मटाला काय झालंय कि डेस्कला कदम यांच्याकडून काही आमिष मिळालयं.. जयंत होवाळ यांना चक्कर का आली...याचा शोध घ्यावाच लागेल यावर सर्व कर्मचा-यांचे एकमत झाले असून माजी मुख्य वार्ताहर समीर कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती गठीत करून याचा शोध कर्मचारी घेणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. तो अहवाल नंतर अपांना सादर करण्यात येणार आहे. तसेच एक प्रत विद्यमान चिफ रिपोर्टर जयंत होवाळ यांनाही सादर करण्यात येणार असून त्यांच्या चक्करीचे रहस्यही उलगडणार आहे.