Tuesday, February 8, 2011

बोजेवारांची अडिचकी...

श्रीकांत बोजेवार यांनी लोकसत्तेच्या निवासी संपादकपदाची धुरा सांभाळल्याचे वृत्त पसरले आणि लोकसत्तेच्या पत्रकारांना घटनेचा अर्थ-अन्वयार्थ लावण्यासाठी आणखी एक नवा विषय मिळाला. प्रत्येकजण आपापल्या सोयीने, अनुभवाने, बदललेल्या वातावरणाच्या अनुषंगाने याचा अर्थ लावत असल्याचे समजते. फारशी बातमीदारी केलेल्या, बातम्याचे संपादनही फारसे केलेल्या आणि कायम फिचर्स, सटायर लिखाण केलेल्या बोजेवारांच्या गळ्यात ही माळ पडली तरी कशी, यावरच प्रामुख्याने खल सुरू असल्याचे समजते. पण तरीही आता नव्या बदलांशी जुळवताना प्रत्येकाने काही ना काही योजना आखल्याचेही वृत्त आहे. काही बातमीदारांनी म्हणे आता दोन फूल आणि एक हाफ स्टाईलमध्ये बातम्या लिहिण्याचे निश्चित केल्याचे कळते. आता या धोरणाचा काहींनी अवलंब केला की, त्यांच्या बातम्या अधिक ठळकपणे छापून येणार असे माहिती असल्याने नाराजीने का होईना पण अन्य बातमीदारांनीही याचा स्टाईलचा अवलंब करायचे ठरवले आहे. बोजेवारांनी पदभार स्वीकारल्याच्या संध्याकाळीच आपापल्या बीटवरून कार्यालयात रिपोर्टर्स आले तेव्हा सर्वांची एक अनौपचारिक बैठक झाली म्हणे. रिपोर्टर्सच्या वर्तुळात मानाचे स्थान असलेल्या आणि केतकर साहेबांचे सारथी असलेल्या सादतभाईंनी विषयाला हात घालत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये...ये बहुत ही अच्छा है...वगैरे सुरूवात केली. मग काय संतोष प्रधानांनी तर ..वा.वा..म्हणजे काय...आता आमच्या बातम्यांची स्टाईल बघा फक्त तुम्ही...असे म्हणत मुद्याला हात घातला...अँग्री यंग मॅन समर खडस यांनी दोन फूल ठिक आहे पण च्यायला हे हाफ वगेरै आपल्याला जमणार नाही. हे साले हाफ म्हणजे हाफ चड्डीची लाईन...वगैर म्हणत...आपले कम्युनिस्ट धोरण अधोरेखित केले. केदार दामले म्हणाले, अरे पण मी तर दररोज तीन हाफच बातम्या देतो...म्हणजे आता मी जर दोन फूल आणि एक हाफ बातमी दिली..तर पाच हाफ इतकीच माझ्या कामाची नोंद होणार का...रामशास्त्री गोगटे साहेबांनी तर याच्याही पुढे जात, अरे पण माझा काय संबंध ? नीट काय ते धोरण स्पष्ट व्हायला पाहिजे...माझी एक बातमीच पाच कॉलमी असते...म्हणजे चार फूल आणि एक हाफ...मग मी कसे लिहायचे आहे...सुनील डिंगणकर तर बोजेवारांच्या या नियुक्तीनंतर फारच खूश झाल्याचे समजते...कारण बोजेवारांच्या मार्गावरून त्यांचा प्रवास सुरू असल्याने भविष्यात आपणही लोकसत्तेत निवासी संपादक होऊ शकतो, अशी स्वप्न त्यांना पडायला लागली आहे...असो...तिकडे डेस्कची मंडळी मनात म्हणताहेत की, आधीच महापे त्यात बोजेवार ! लोकसत्तेच्या कर्मचा-यांचे एकवेळ ठिक आहे, पण बोजेवारांच्या या नियुक्तीने लोकसत्ताच्या बाहेरची अन्य दोन मंडळीही प्रचंड व्यथित झाली आहेत...एक म्हणजे आपला नंबर लागेल या आशेवर असलेले शब्दच्छलसम्राट प्रवीण टोकेकर आणि दुसरे म्हणजे बोजेवारांचे शेजारी शैलेंन्द्र शिर्के...असो...जगात काहीही घडले तर सव्वा नऊची गाडी आजवर चुकवणा-या बोजेवारांना निवासी संपादक झाल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत कार्यालयात राहावे लागत असल्याने तेही जवाबदारीबरोबर आलेल्या या नव्या दुःखाला कशी वाचा फोडायची या विवंचनेत आहेत...कदाचित निवासी संपादकपदी आरूढ झाल्यानंतर येणा-या पहिल्या रविवारी याच विषयावर ते दोन फूल एक हाफ लिहितात का...याची प्रतीक्षा आम्हा सर्वांना आहे.