अखेर सकाळला पत्रकार भरतीचा मुहुर्त सापडला. सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या लेखी परिक्षेचा निकाल लागला आणि गेल्या मंगळवारी अखेर निर्णायक मुलाखती झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळ वर्तमापत्रातून मटा ऑनलाईनमध्ये गेलेले सुनील घुमे पुन्हा सकाळमध्ये परतणार आहेत. तर सध्या पत्रकारितेतून टाईम प्लीज घेतलेले बंधुराज लोणे हे ही सकाळमध्ये रूजू होणार आहेत. लोकसत्तेतील शिक्षणतज्ज्ञ तुषार खरात हे देखील पुन्हा स्वगृही परतायच्या विचारात असल्याचे समजते.
Thursday, February 17, 2011
Tuesday, February 15, 2011
आपण यांना पाहिलतं का ?
गोविंद तळवळकर, माधव गडकरी यांचा काळ संपला आणि सुरू झाले केतकरांचे युग...पण एक केतकरांचा अपवाद वगळला तर अनेक संपादक आले आणि कालौघात गायब झाले. सध्या आम्ही त्यांचा शोध घेतोय की, गेल्या पाच वर्षांपूर्वी संपादकीय वर्तुळात परिवर्तनाची लाट आल्याप्रमाणे उगवलेले हे संपादक आता कुठे गायब झाले आहेत ? आपल्याला यापैकी कुणाची माहिती मिळाली तर त्यांची ख्यालीखुशाली जरूर कळवा.
१) संजीव लाटकर - मित्रा...आपल्याला हे असं करायचयं...ही खास लाटकरी लकब. संपादकपदाचा प्रवास लोकमतपासून सुरू करून सकाळ, आयटीएन आणि परत साम...नंतर गायब...पण लाटकर ऐनभरात असताना पत्रकारांच्या चर्चा मात्र जोरात होत्या की, काय उमदा माणूस आहे...मजा येते काम करायला यांच्यासोबत...तरी ज्या मटाकर्मींना त्यांच्याबद्दल पोटदुखी होती, ते म्हणायचे अरे पक्का बोलबच्चन माणूस आहे....असो लोकशाहीत प्रत्येकाच्या मताचा सन्मान ठेवायलाच पाहिजे...हे महाशय सध्या मुख्य प्रवाहातून एकदम गायबच झाले आहेत. (अत्यंत प्रयोगनशील असलेले लाटकर साहेब सध्या म्हणे काही व्हिज्युअल क्लासरूमचा प्रकल्प तयार करीत आहेत.)
२) इब्राहिम अफगाण - मटामध्ये उत्तम सुरू असताना या महाशयांना गोव्याच्या समुद्रकिना-याने पुन्हा साद घातली आणि सागरा प्राण तळमळला असे म्हणत पुन्हा त्यांनी गोव्याचा रस्ता धरला...थेट दाखल झाले गोमांतकच्या कार्यकारी संपादकपदी...पण बदललेल्या गोव्यात आपले लहानपण शोधताना अफगाणांचे गणित चुकले आणि परत आले ते सकाळमध्ये मुंबईला...परतल्यावर सकाळमध्ये सकाळी कार्यालयात जाण्याखेरीज ते नेमके काय करायचे, यावर एक डॉक्युमेंटरी येणार असल्याचे ऐकलय...गेल्या काही महिन्यांपासून पी.आर.गिरी करत असल्याचं ऐकिवात आहे. जुना मित्र प्रवीण टोकेकर आपल्या लोकप्रभेत त्यांना अधूनमधून फोडणी घालण्याची संधी देतो...पण तेही विजनवासातच आहेत.
३) आनंद आगाशे - सकाळ समुहाचे मुख्य संपादक...(एकेकाळी) त्यानंतर मालकांची मर्जी गेल्याने पुण्यातही दिसत नाहीत म्हणे. मधल्या काळात सकाळमधील काही नापास शिलेदारांना सोबत घेऊन मीडिया सोल्युशन्सची वेबसाईटवगैरे काढली होती...आणि अलीकडेच मेनका आणि काही मासिके त्यांनी विकत घेतली आहेत...पण मुख्य प्रवाहातून बाहेरच...
४) मिलिंद कोकजे - आयला...मी मटा ऑनलाईनचा संपादक असताना बरं होतं यार...ही कटकट नव्हती., झी च्या कार्यालयात दिवसातून एकदा तरी हे वक्तव्य केल्याशिवाय कोकजेंना कार्यालयात डुलकी लागत नसे. झी मराठीच्या वृत्तविभागाच्या प्रमुख पदापासून सुरूवात केलेल्या कोकजेंनी बदलत्या परिस्थीतीशी जुळवून घेत झी मध्ये दिवस काढले....कुठल्यातरी मीडियाशी संबंधित एनजीओशी लागेबांधे जुळल्यावर मात्र मग ते पूर्णवेळ मीडिया एक्टिव्हिस्ट झाले...पण नव्याची नवलाई संपली आणि पुन्हा झीच्याच एका नव्या मल्टिमीडिया कंपनीत ते रूजू झाले. एका दगडात दोन पक्षी मारल्याचा आनंद त्यांना सध्या झालाय...वेबसाईटचे आरामशीर काम आणि झीमधून मिळणारा भरभक्कम पगार...एसी कॅबिनमध्ये दुपारची डुलकी...चांगले नशीब यापेक्षा वेगळे असते का ?
५) हेमंत देसाई - यांचा तर काय रूबाब होता एकेकाळी...पण आपली ओळख ब्रँडमुळे असते हे बहुधा न उमगल्याने मटामधून बाहेर पडावे लागल्यानंतर त्यांना खूप वैफल्य आले होते म्हणे...पण आता सावरलेत...वागळेंच्या जग जिंकण्याच्या मोहिमेत अधूनमधून ते भाग घेत असतात...पण संपादकपदाचे पोटेन्शियल आपल्यातच आहे, असा ठाम विश्वास असलेले देसाई तूर्तास तरी फ्रिलान्सर म्हणूनच कार्यरत आहेत.
६) आल्हाद गोडबोल - हे सध्या संपादकपदी आहेत...पण नेमके काय करतात ते माहित नाही. प्रिट लाईनवर नाव छापून येते म्हणून संपादक म्हणायचे अशी त्यांची परिस्थिती असल्याची चर्चा प्रहारच्याच कार्यालयात आहे. पण फार टेन्शन घेत नाहीत...निवांतपणे तंवाग, अरुणाचल प्रदेश आणि तत्सम पूर्वेकडील राज्यांतील द-याखो-यांचा त्यांचा अभ्यास जोरात सुरू आहे.
७) मुकेश माचकर - ...ही सुरुवातीची तीन टिंबे माचकरांना समर्पित. आडनावात ज च्या ऐवजी च पडल्याची चर्चा ते मटात असल्यापासून आहे. आपल्याएवढी माहिती कुण्णाकुण्णाला नाही, अशा ठाम समजुतीवर ते ठाम असून प्रहारच्या निवासी संपादकपदाची धुरा सांभाळत आहेत. माधुरी दीक्षित फिल्म इंडस्ट्रित सक्रित असताना आणि सध्या अमेरिकेतून परल्यावर छोट्या पडद्यावर पाहताना आपल्या मनात जो नॉस्टेलजिया आणि तीची जादू कायम असली तरी ओके अशी भावनांची जी काही सरमिसळ करणारे भाव येतात ना...अगदी तस्स झालयं...मटातले माचकर आणि प्रहारमधले माचकर यांच्या प्रतिमा मनात अगदी माधुरीच्या भावनेप्रमाणे येतात.
८) संजीव साबडे - काय दरारा होता या माणसाचा मटामध्ये...एकदम एखाद्या अस्सल गावरान पुढा-यावानी...पण आता पुढारीत जाऊन त्यांचे काय झालय काही कळायला मार्ग नाही. लेखणी जितकी त्यांना वश तशाच ब-याचकाही गोष्टी. पण सध्या अंधेरी ते नवीमुंबई व्हाया गिरगाव असा प्रवास करून थकून जातात म्हणे...संध्याकाळी मग प्रेसक्लब किंवा सोय होईल तिथे...आठवणींचा हळवा कोपरा उलगडतात...पण साहेब तुमचा मटातला रूबाब आठवून तुम्हाला काय आम्हालाही वाईट वाटत...
...यादी बरीच आहे...पण आम्हाला बाकीचीही कामं आहेत, त्यामुळे तूर्तास इतकेच.
ता.क. - हे लिखाण संपवता संपवता कळलेली माहिती अशी की, आजारपणाच्या प्रदीर्घ रजेवरून चंदू कुलकर्णी पुन्हा लोकमतमध्ये सक्रिय झाले आहेत. (आणखी एकाचा शोध घेण्याचे श्रम वाचले.)
Subscribe to:
Posts (Atom)